Saturday, 12 November 2011
घोणस - Russell's viper
घोणस - Russell's viper
घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.
घोणसांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.
घोणसाचे विष अतिशय जहाल असते. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणार्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.
घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.
FOR MOR INFORMATION ALSO VISITE TO THIS SITE
adi....
http://ygurjar.blogspot.com/2009/01/blog-post.html
http://www.yuwarajgurjar.com/
1. साधारण साडेपाच फूट लांबी असणारा हा सर्प समुद्रसपाटीपासून पर्वतापर्यंत कोठेही आढळतो. घनदाट जंगलात मात्र तो वास्तव्य करत नाही. बदामी, तपकिरी रंगाच्या याच्या अंगावर काळपट रंगाचे डाग असतात. याच्या डोक्यावर बाणाच्या टोकाप्रमाणे दिसणारी खूण असते. डोके चपटे व त्रिकोणी असते. याच्या ओठांच्या दोन्ही कडांपासून गालापर्यंत करड्या पिवळसर रंगाच्या दोन रेषा असतात. त्याच्या नाकपुड्या मोठ्या असतात. याच्या डोळ्यांची बुब्बुळे गोल व आतील बाहुल्या उभ्या असतात. घोणसाची शेपटी आखूड असते. याचे दात खूप मोठे असल्याने एकाच दंशात बरेच विष बाहेर येते. आपल्या जीवाला धोका आहे असे समजताच तो अंगाचे वेटोळे करून रहातो. याच्या फुत्कारण्याचा आवाजही मोठा असतो.
2.घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणार्या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतातघोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.
घोणसांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.
घोणसाचे विष अतिशय जहाल असते. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणार्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.
घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.
FOR MOR INFORMATION ALSO VISITE TO THIS SITE
adi....
http://ygurjar.blogspot.com/2009/01/blog-post.html
http://www.yuwarajgurjar.com/
फुरसे - Echis
Saw-scaled viper
Saw-scaled viper
1. भारतात सर्वत्र आढळणारा हा सर्प आक्रमक असतो. तो अंडी न देता पूर्ण वाढ झालेल्या पिल्लांना जन्म देतो. याचा रंग बदामी, तपकिरी मातकट असून त्याच्या पाठीच्या मध्यावर लहान पांढर्या चौकड्या असतात. याच्या डोंक्याचा आकार लांबट व त्रिकोणी असून ते रुंद असते. फुरशाची शेपटी लहान असून निमुळती होत गेलेली असते. इंग्रजी आठ आकाराचे वेटोळे करून तो रहातो सर्व विषारी सर्पांमध्ये फुरसे आकाराने लहान असते. फुरसे नेहमी आपले भक्ष दिवसा शोधते . उंदराची व बेडकाची पिल्ले, विंचू हे त्याचे अन्न असते. त्यांच्या दातांची लांबी जास्त असते. पण विषग्रंथी मात्र लहान असतात.2. नाग, मण्यार, घोणस या प्रकारचे साप संपूर्ण महाराष्ट्रात मिळतात; मात्र "फुरसे' जातीचे साप फक्त कोकणातच आणि तेही केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आढळतात. तपकिरी गडद रंगावर दोन्ही बाजूस नागमोडी रेषा असलेल्या या सापाची लांबी एक ते दीड फुटांपर्यंत असते. विंचू, पाली, सरडे हे मुख्य खाद्य असलेले हे साप प्रामुख्याने कातळावर जुनाट दगडाखाली हमखास आढळतात. त्याच्या शरीरावर उठावदार खवले असतात.
मण्यार
मण्यार
मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणार्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे. भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. ह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मानेच्या बाजुला पांढरे ठिपके असतात. याचे तोंड वेटोळे व ओठ पांढरट असतात. याच्या डोळ्यांची बुब्बुळे रंगहीन असून बाहुल्या गोल असतात मण्यार एकावेळी आठ ते दहा अंडी देते ती दोन सेमी जाड व चार सेमी लांब असतात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. मण्यार मुख्यत्वे निशाचर आहे.निशाचर असणारा हा सर्प लाजरा बुजरा आणि मुद्दाम कोणाला दंश न करणारा असा आहे. अन्नाच्या व थंडाव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात.
अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाल व सरडा, इतर छोटे साप व बेडूक इत्यादी आहे
वॉल्स सिंध मण्यार
अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाल व सरडा, इतर छोटे साप व बेडूक इत्यादी आहे
विष
मण्यारचे विष हे नागाप्रमाणे असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणाली (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते.. मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. निशाचर असलेल्या मण्यार सर्प रात्रीच निघत असल्याने झोपेत चावल्यास बऱ्याचदा किडा चावला असे समजून दुर्लक्ष होते. त्याचा विषदंत लहान असल्याने विष शरीरात पसरण्यास वेळ लागतो. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्चास घेण्यास त्रास होऊ लागतो काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.वॉल्स सिंध मण्यार
महाराष्ट्रात क्वचितप्रसंगी हा साप पुणे व सोलापूर जिल्ह्य़ात आढळला आहे.
भारतात हा साप उत्तर प्रदेशात फैजाबाद, बिहारमध्ये गया, बंगालमध्ये काही
ठिकाणी आढळून आला आहे. या जातीचा साप जास्तीत जास्त १५२ से.मी. वाढतो.
त्याचे सर्पशास्त्रीय नाव बंगारस सिंधनस वॉली असे आहे.
गडद काळ्या रंगाच्या असणाऱ्या या सापाच्या अंगावर डोक्यापासून शेपटीपर्यंत समान अंतरावर एकेरी
पांढरे आडवे पट्टे असतात. याचे डोळे काजळाप्रमाणे काळेभोर असतात व त्यात
डोळ्यांची बाहुली दिसून येत नाही. तोडाखालील भाग हा गडद पिवळा असतो. ही
याला ओळखण्याची पद्धत आहे. हा साप निशाचर असून अंडी घालणारा आहे. विशेष
म्हणजे हा साप स्वजातीभक्षक असून आपल्याच जातीतील इतर सापांना खातो. हा साप
रागीट स्वभावाचाच समजला जातो.
Sunday, 24 July 2011
Subscribe to:
Posts (Atom)



