Sunday, 16 September 2012

बिनविषारी सर्प

वाळा
वाळा साप लालसर लपकिरी रंगाचा असून याचा पोटाकडचा भाग फिका असतो. याच्या सडपातळ गोलाकार शरीरावर जवळजवळ असणारे खवले दिसतात. याचे डोळे अतिशय छोटे असतात आणि शेपूट टोकेरी असते. वाळ्याची लांबी सरासरी १२.५ सें.मी., तर अधिकतम २३ सें.मी. असते.

 हा छोट्या आकारमानाचा आंधळा, बिनविषारी साप आहे. अतिशय निरुपद्रवी असा हा साप दिसायला गांडुळासारखा असल्याने बरेचदा लोक गल्लत करतात. पण त्याच्या अंगावर गांडुळासारखी वलये नसतात. कडक जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना कधी कधी दिसतो.

वाळा आशिया आणि आफ्रिकेत सापडतो. भारतात सर्वत्र वाळ्याचा वावर आढळला आहे. या प्रजातीची कोणतीही उपप्रजाती आतापर्यंत आढळून आलेली नाही.

प्रजातीचे शास्त्रीय नाव हे ब्राह्मण या संस्कृत शब्दापासून घेण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात वाळ्याला 'दानवं', 'अंधासाप', 'सोमनाथ' या नावांनीही ओळखले जाते. गोव्यात याला 'टिल्यो' असे संबोधतात.

वाळ्याचे वास्तव्य मऊ जमिनीत आढळते. पावसाने मऊ झालेली माती उकरण्यासाठी हा आपले डोके वापरतो. भारतामध्ये वाळा फक्त पावसाळ्यात जमिनीवर वावरताना दिसतो; इतर वेळी जमिनीखाली दीर्घनिद्रा घेतो.

मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी, अळ्या


अजगर ( Python )

 
 अजगर हा
उष्णकटिबंधात आढळणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे.
जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात.
पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर भारत, सुमात्रा व जावा या प्रदेशांत  आढळते. याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट जंगलांत झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही हा सर्प आढळतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाण-अजगर अँनाकोंडा म्हणून ओळखले जातात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असतानासुद्धा उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते. इतर सर्पांप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते. 
मानवप्राणी अजगराचे नैसर्गिक भक्ष्य नाही. मात्र तो अजगराचा सर्वात प्रमुख शत्रू आहे.  


 धामण ( Indian Rat Snake)

धामीणीला ओळखण्याची सर्वात सोपी खूण म्हणजे तिचे छोटे डोके, मोठे डोळे जबड्याखालील रेषा. धामण अतिशय लांब असते. सरासरी लांबी ते १० फुट असते १२ फुटापर्यंत वाढू शकते. धामण ही डोक्यापासून शरीराच्या मध्यापर्यंत जाड होत जाते शेपटी ही अतिशय टोकदार असते. त्वचा ही हलक्या अथवा गडद हिरव्या, पोपटी, गडद करड्या रंगात असते. नागांशी रंगात अंगावरील पट्यांमध्ये तसेच लांबीमध्ये मान उंचावून पहाण्याच्या सवयीमध्ये बरेच नागाशी साधर्म्य असल्याने बहुतेकदा नाग समजून धामीणीला मारले जाते. धामणीचा वेग हे तिचे वैशिठ्य आहे. अत्यंत वेगाने हालचाल करून भक्ष्य मिळवण्यात धामण पटाईत आहे.

वयस्क धामण नागाप्रमाणेच गुर्रावते तिव्र दन्श देउन पळ काढते.

              धामणीचे मुख्य खाद्य उंदीर घुशी तत्सम कुरतडणारे प्राणी, एक धामण वर्षाला ६० हून अधिक उंदराचा फडशा पाडते त्यामुळे धामण ही शेतकर्याची मित्र आहे. महाराष्ट्रात धामणीबद्द्ल माहिती असलेले शेतकरी धामणीचा आदर करतात असे पहाण्यात आले आहे.
 

No comments:

Post a Comment