नाग - COBRA
नाग हा विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे
नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्याअतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखील विविध खूणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.
नागाचे मुख्य खाद्य हे उंदीर, बेडूक, सरडाे इतर छोटे प्राणी व पक्षी आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकर्याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रू माणूस आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये मुंगूस, गरुड, कोल्हा े, खोकड (भारतीय कोल्हा), अस्वल े तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो . नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो ( आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो .
भारतीय नाग - Indian Cobras (Naja naja naja)
नागाची सर्वाधिक आढळणारी जात ही भारतीय उपखंडात आढळते. नागहिमालय मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे वावर सर्वत्र असतो उपखंडात आढळते. याच्या फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो भारतातील .हिमालयातील मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे वावर सर्वत्र असतो.
काळा नाग - Black Cobras (Naja naja karachiensis)
ही मुख्य नागाचीच उपजात आहे. ही जात प्रामुख्याने पाकिस्तान व राजस्थान मध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर काळे असते तसेच मुख्य नागापेक्षा लांबीने लहान असतो व फणादेखील लहान असतो.शून्य आकडी नाग
प्रामुख्याने दक्षिण भारतात व आशियातील इतर देशात आढळतात. याच्या फण्यामागे शून्यचा आकडा असतो. फण्यामागील आकडा सोडला तर इतर सर्व गोष्टी मुख्य नागा सारख्याच आहेत.थुंकणारा नाग - Spiting कब्रस
हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, मलेशिया,व्हियेतनाम व चीन या देशांत आढळतो. घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवास्थान आहे. नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातांमधून विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर उडवतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. विषाच्या प्रभावाने भक्ष्य तात्पुरते अंध होते व त्याचा फायदा घेउन हा भक्ष्याची शिकार साधतो. डिस्कव्हरी चॅनेल
वरील क्षणचित्रांमध्ये कित्येक मीटरपर्यंत हे नाग चिळकांडी उडवू शकतात असे दाखवले आहे.
No comments:
Post a Comment