Saturday, 12 November 2011

घोणस - Russell's viper

 घोणस - Russell's viper
 1. साधारण साडेपाच फूट लांबी असणारा हा सर्प समुद्रसपाटीपासून पर्वतापर्यंत कोठेही आढळतो. घनदाट जंगलात मात्र तो वास्तव्य करत नाही. बदामी, तपकिरी रंगाच्या याच्या अंगावर काळपट रंगाचे डाग असतात. याच्या डोक्यावर  बाणाच्या टोकाप्रमाणे दिसणारी खूण असते. डोके चपटे व त्रिकोणी असते. याच्या ओठांच्या दोन्ही कडांपासून गालापर्यंत करड्या पिवळसर रंगाच्या दोन रेषा असतात. त्याच्या नाकपुड्या मोठ्या असतात. याच्या डोळ्यांची बुब्बुळे गोल व आतील बाहुल्या उभ्या असतात. घोणसाची शेपटी आखूड असते. याचे दात खूप मोठे असल्याने एकाच दंशात बरेच विष बाहेर येते. आपल्या जीवाला धोका आहे असे समजताच तो अंगाचे वेटोळे करून रहातो. याच्या फुत्कारण्याचा आवाजही मोठा असतो.
2.घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणार्‍या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात
घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.

घोणसांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.

घोणसाचे विष अतिशय जहाल असते. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍र्‍या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.

घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.

FOR MOR INFORMATION ALSO VISITE TO THIS SITE
adi....

http://ygurjar.blogspot.com/2009/01/blog-post.html

http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment