फुरसे - Echis
Saw-scaled viper
Saw-scaled viper
1. भारतात सर्वत्र आढळणारा हा सर्प आक्रमक असतो. तो अंडी न देता पूर्ण वाढ झालेल्या पिल्लांना जन्म देतो. याचा रंग बदामी, तपकिरी मातकट असून त्याच्या पाठीच्या मध्यावर लहान पांढर्या चौकड्या असतात. याच्या डोंक्याचा आकार लांबट व त्रिकोणी असून ते रुंद असते. फुरशाची शेपटी लहान असून निमुळती होत गेलेली असते. इंग्रजी आठ आकाराचे वेटोळे करून तो रहातो सर्व विषारी सर्पांमध्ये फुरसे आकाराने लहान असते. फुरसे नेहमी आपले भक्ष दिवसा शोधते . उंदराची व बेडकाची पिल्ले, विंचू हे त्याचे अन्न असते. त्यांच्या दातांची लांबी जास्त असते. पण विषग्रंथी मात्र लहान असतात.
2. नाग, मण्यार, घोणस या प्रकारचे साप संपूर्ण महाराष्ट्रात मिळतात; मात्र "फुरसे' जातीचे साप फक्त कोकणातच आणि तेही केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आढळतात. तपकिरी गडद रंगावर दोन्ही बाजूस नागमोडी रेषा असलेल्या या सापाची लांबी एक ते दीड फुटांपर्यंत असते. विंचू, पाली, सरडे हे मुख्य खाद्य असलेले हे साप प्रामुख्याने कातळावर जुनाट दगडाखाली हमखास आढळतात. त्याच्या शरीरावर उठावदार खवले असतात.
No comments:
Post a Comment