मण्यार
मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणार्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे. भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. ह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मानेच्या बाजुला पांढरे ठिपके असतात. याचे तोंड वेटोळे व ओठ पांढरट असतात. याच्या डोळ्यांची बुब्बुळे रंगहीन असून बाहुल्या गोल असतात मण्यार एकावेळी आठ ते दहा अंडी देते ती दोन सेमी जाड व चार सेमी लांब असतात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. मण्यार मुख्यत्वे निशाचर आहे.निशाचर असणारा हा सर्प लाजरा बुजरा आणि मुद्दाम कोणाला दंश न करणारा असा आहे. अन्नाच्या व थंडाव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात.
अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाल व सरडा, इतर छोटे साप व बेडूक इत्यादी आहे
वॉल्स सिंध मण्यार
अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाल व सरडा, इतर छोटे साप व बेडूक इत्यादी आहे
विष
मण्यारचे विष हे नागाप्रमाणे असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणाली (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते.. मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. निशाचर असलेल्या मण्यार सर्प रात्रीच निघत असल्याने झोपेत चावल्यास बऱ्याचदा किडा चावला असे समजून दुर्लक्ष होते. त्याचा विषदंत लहान असल्याने विष शरीरात पसरण्यास वेळ लागतो. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्चास घेण्यास त्रास होऊ लागतो काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.वॉल्स सिंध मण्यार
महाराष्ट्रात क्वचितप्रसंगी हा साप पुणे व सोलापूर जिल्ह्य़ात आढळला आहे.
भारतात हा साप उत्तर प्रदेशात फैजाबाद, बिहारमध्ये गया, बंगालमध्ये काही
ठिकाणी आढळून आला आहे. या जातीचा साप जास्तीत जास्त १५२ से.मी. वाढतो.
त्याचे सर्पशास्त्रीय नाव बंगारस सिंधनस वॉली असे आहे.
गडद काळ्या रंगाच्या असणाऱ्या या सापाच्या अंगावर डोक्यापासून शेपटीपर्यंत समान अंतरावर एकेरी
पांढरे आडवे पट्टे असतात. याचे डोळे काजळाप्रमाणे काळेभोर असतात व त्यात
डोळ्यांची बाहुली दिसून येत नाही. तोडाखालील भाग हा गडद पिवळा असतो. ही
याला ओळखण्याची पद्धत आहे. हा साप निशाचर असून अंडी घालणारा आहे. विशेष
म्हणजे हा साप स्वजातीभक्षक असून आपल्याच जातीतील इतर सापांना खातो. हा साप
रागीट स्वभावाचाच समजला जातो.
No comments:
Post a Comment