पट्टेरी पोवळा
हा साप विषारी असून प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळतो. महाराष्ट्रात आंबोली, कोयना, कास, पाचगणी, खंडाळा, भीमाशंकर येथे आढळतो. त्याला हिंदीत कालाधारी मूंगा तर इंग्रजीत स्ट्रीप्ड कोरल स्नेक असे म्हटले जाते. त्याचे शास्त्रीय नाव कॅ लीओपीस निग्रेन्स आहे. त्याची लांबी जास्तीत जास्त तीन फूट नऊ इंच असते. पर्वतीय प्रदेशात त्याची लांबी अधिक असते. हा साप दिनचर तसेच निशाचर असून छोटे सरडे, इतर साप हे त्याचे भक्ष्य असते. पावसाळ्यात मादी तीन ते सहा अंडी देते. या सापाचे शरीर लांब, सडपातळ, व दंडगोलाकार असून छोटे काळे डोळे, शेपूट आखूड, लाल व पांढरे खवले, गडम, काळा जांभळट रंग , पाठीवर तीन ते पाच उभ्या काळ्या रेषा, डोळ्यांमध्ये एक फिक्कट काळा आडवा पट्टा ही याची वैशिष्ट्ये असतात. पोटाकडचा भाग चकचकीत व लाल असून त्यावर पांढरे आडवे पट्टे, रेषा असतात. हे कासचे पठार पावसाळ्यात फुलणाऱ्या विविध प्रजातीच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे.
Black Racer, a photo by cotinis on Flickr.

No comments:
Post a Comment