Sunday, 16 September 2012

साप :-: SNAKES

साप 

संत तुकारामांच्या अभंगातील ओळी .

' मारू नये सर्प, संताचिया दृष्टी,

होतील ते कष्टी, व्यापकपणे।।'

 

 "साप डूख धरतो. तो चावल्याने माणूस जगत नाही.त्यामुळे साप दिसताच त्याला ठेचून काढले पाहिजे,' या गैरसमजुतीतून आणि सामान्य मानसिकतेमुळे दरवर्षी देशभरात हजारो सापांना ठार केले जाते. 

     भारतात आढळणाऱ्या 275 जातींच्या सर्पांपैकी केवळ सात जाती व पोटजातीचे सर्प विषारी आहेत; उर्वरित बहुतांश बिनविषारी आहेत, याकडे दुर्लक्ष केले जाते.

     शेतीपिकाचे नुकसान करणारे उंदीर खाणारा हा सर्प शेतकऱ्याचा आणि तमाम मानवजातीचा मित्र आहे,

 

विविध जाती

विषारी सापांची उदाहरणे 

  •  नाग 

  • नागराज 

  • मण्यार

  • फुरसे

  • घोणस

  • समुद्री साप

  • पोवळा

  • पट्टेरी पोवळा

  • चापडा

    मलाबार पिट व्हायपर.

बिनविषारी सापांची उदाहरणे
  • अजगर,

    धामण,

    तस्कर,

    गवत्या,

  •  वाळा सर्प,

     खापरखवल्या,

    एकेरी,

     डुरक्‍या घोणस,

    मांडुळ, 

    चित्रांगण,

    कवड्या,

    कुकरी,

    नानेटी,

    धूळनागीण,

    रुखई,

    पाणदिवड,

      काळतोंड्या,

    रजतबंसी,

    नानेटी

      

    निमविषारी-

  • झिलाण, 

    श्वानमुखी,

      मांजऱ्या,

    लिथ सॅंड स्नेक,

      हरणटोळ,

     रेतीसर्प,

नाग - COBRA

नाग - COBRA

नाग हा विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशिया आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे

नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या
अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखील विविध खूणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.
नागाचे मुख्य खाद्य हे उंदीर, बेडूक, सरडा इतर छोटे प्राणीपक्षी आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकर्‍याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रू  माणूस आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये मुंगूसगरुड, कोल्हा , खोकड (भारतीय कोल्हा), अस्वल तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो . नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो ( आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो .

भारतीय नाग - Indian Cobras  (Naja naja naja)

 नागाची सर्वाधिक आढळणारी  जात ही भारतीय उपखंडात आढळते. नागहिमालय मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे वावर सर्वत्र असतो उपखंडात आढळते. याच्या फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो भारतातील .हिमालयातील मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे वावर सर्वत्र असतो.


काळा नाग - Black Cobras (Naja naja karachiensis)

  ही मुख्य नागाचीच उपजात आहे. ही जात प्रामुख्याने पाकिस्तानराजस्थान मध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर काळे असते तसेच मुख्य नागापेक्षा लांबीने लहान असतो व फणादेखील लहान असतो.


शून्य आकडी नाग

 प्रामुख्याने दक्षिण भारतात व आशियातील इतर देशात आढळतात. याच्या फण्यामागे शून्यचा आकडा असतो. फण्यामागील आकडा सोडला तर इतर सर्व गोष्टी मुख्य नागा सारख्याच आहेत.



थुंकणारा नाग - Spiting कब्रस
  हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, मलेशिया,व्हियेतनाम चीन या देशांत आढळतो. घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवास्थान आहे. नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातांमधून विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर उडवतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. विषाच्या प्रभावाने भक्ष्य तात्पुरते अंध होते व त्याचा फायदा घेउन हा भक्ष्याची शिकार साधतो. डिस्कव्हरी चॅनेल
वरील क्षणचित्रांमध्ये कित्येक मीटरपर्यंत हे नाग चिळकांडी उडवू शकतात असे दाखवले आहे.


नागराज -King Cobras

हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात सर्वाधिक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. दिसायला रुबाबदार हा साप लांबीला पाच ते साडेपाच मी लांबीला असू शकतो. याचा फणा इतर नागांपेक्षा छोटा असतो. विषारी असला तरी घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो (काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे बांधतो. तसेच पिल्ले बाहेर येइपर्यंत अंड्याचे रक्षण करतो. हा साप दुसर्या सपना खातो यात नर अक्राने मोठा असतो. व मादी लहान असते. नर हा मादीलापण काहून टाकतो.

नागाचे विष

दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात त्यामुळे नागाच विष हा काय प्रकार आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. बहुतांशी नाग चावला आहे या भीतीनेच माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वता:हून आक्रमण करत नाहित केलाच तर हा नाग आपले संरक्षणाहेतू करतो. जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काही वेळा कोरडा दंश देखील होउ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे संवेदन प्रणाली neural systemकाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्या माणसाला विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास असमर्थ होतात. जीव मुख्यत्व मेंदूमध्य नियंत्रित श्वसन प्रणाली कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव १/२ तासात ते दीड दिवसापर्यंत जाउ शकतो.



बिनविषारी सर्प

वाळा
वाळा साप लालसर लपकिरी रंगाचा असून याचा पोटाकडचा भाग फिका असतो. याच्या सडपातळ गोलाकार शरीरावर जवळजवळ असणारे खवले दिसतात. याचे डोळे अतिशय छोटे असतात आणि शेपूट टोकेरी असते. वाळ्याची लांबी सरासरी १२.५ सें.मी., तर अधिकतम २३ सें.मी. असते.

 हा छोट्या आकारमानाचा आंधळा, बिनविषारी साप आहे. अतिशय निरुपद्रवी असा हा साप दिसायला गांडुळासारखा असल्याने बरेचदा लोक गल्लत करतात. पण त्याच्या अंगावर गांडुळासारखी वलये नसतात. कडक जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना कधी कधी दिसतो.

वाळा आशिया आणि आफ्रिकेत सापडतो. भारतात सर्वत्र वाळ्याचा वावर आढळला आहे. या प्रजातीची कोणतीही उपप्रजाती आतापर्यंत आढळून आलेली नाही.

प्रजातीचे शास्त्रीय नाव हे ब्राह्मण या संस्कृत शब्दापासून घेण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात वाळ्याला 'दानवं', 'अंधासाप', 'सोमनाथ' या नावांनीही ओळखले जाते. गोव्यात याला 'टिल्यो' असे संबोधतात.

वाळ्याचे वास्तव्य मऊ जमिनीत आढळते. पावसाने मऊ झालेली माती उकरण्यासाठी हा आपले डोके वापरतो. भारतामध्ये वाळा फक्त पावसाळ्यात जमिनीवर वावरताना दिसतो; इतर वेळी जमिनीखाली दीर्घनिद्रा घेतो.

मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी, अळ्या


अजगर ( Python )

 
 अजगर हा
उष्णकटिबंधात आढळणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे.
जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात.
पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर भारत, सुमात्रा व जावा या प्रदेशांत  आढळते. याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट जंगलांत झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही हा सर्प आढळतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाण-अजगर अँनाकोंडा म्हणून ओळखले जातात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असतानासुद्धा उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते. इतर सर्पांप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते. 
मानवप्राणी अजगराचे नैसर्गिक भक्ष्य नाही. मात्र तो अजगराचा सर्वात प्रमुख शत्रू आहे.  


 धामण ( Indian Rat Snake)

धामीणीला ओळखण्याची सर्वात सोपी खूण म्हणजे तिचे छोटे डोके, मोठे डोळे जबड्याखालील रेषा. धामण अतिशय लांब असते. सरासरी लांबी ते १० फुट असते १२ फुटापर्यंत वाढू शकते. धामण ही डोक्यापासून शरीराच्या मध्यापर्यंत जाड होत जाते शेपटी ही अतिशय टोकदार असते. त्वचा ही हलक्या अथवा गडद हिरव्या, पोपटी, गडद करड्या रंगात असते. नागांशी रंगात अंगावरील पट्यांमध्ये तसेच लांबीमध्ये मान उंचावून पहाण्याच्या सवयीमध्ये बरेच नागाशी साधर्म्य असल्याने बहुतेकदा नाग समजून धामीणीला मारले जाते. धामणीचा वेग हे तिचे वैशिठ्य आहे. अत्यंत वेगाने हालचाल करून भक्ष्य मिळवण्यात धामण पटाईत आहे.

वयस्क धामण नागाप्रमाणेच गुर्रावते तिव्र दन्श देउन पळ काढते.

              धामणीचे मुख्य खाद्य उंदीर घुशी तत्सम कुरतडणारे प्राणी, एक धामण वर्षाला ६० हून अधिक उंदराचा फडशा पाडते त्यामुळे धामण ही शेतकर्याची मित्र आहे. महाराष्ट्रात धामणीबद्द्ल माहिती असलेले शेतकरी धामणीचा आदर करतात असे पहाण्यात आले आहे.