Friday 1 July 2011

सापांचा अभ्यास

सापांच्या बाबतीतही आपल्याकडे अनेक अंधश्रद्धा आजही ऐकायला मिळतात. नाग-नागिण जोडीपैकी एखादं आपल्या हातातून दगावल्यावर दुसरा डूख धरून तुमच्या मागावर असतो असा समज आहे. मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.
आजच्या आधुनिक युगातही भारतात श्रद्धा-अंधश्रद्धा यावर विश्वास ठेवला जातो. आता हेच पाहा ना. सकाळी मुंगुस आपलं भक्ष्य शोधण्यासाठी त्याच्या बिळाबाहेर पडणार हे नक्कीच आहे तर रात्री घुबडाची दिनचर्या सुरू होते. परंतु सकाळच्या प्रहरी मुंगुस दिसणं भाग्याचं असतं. तर रात्री घुबड दिसलं तर ते अपशकुनी. अशा अनेक गैरसमजुतींचा पगडा घट्ट रोवला गेला आहे. सापांच्या बाबतीतही आपल्याकडे अनेक अंधश्रद्धा आजही ऐकायला मिळतात. नाग-नागिण जोडीपैकी एखादं आपल्या हातातून दगावल्यावर दुसरा डूख धरून तुमच्या मागावर असतो असा समज आहे. मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. त्याचप्रमाणे धामण जातीचा साप गाय-म्हैस या प्राण्यांच्या नाकात शेपटी घालतो तसेच त्यांची शेपटी मोडतो. माणसाला जर का या सापाने शेपटी मारली की माणूस नपुंसक होतो, असं म्हटलं आहे. मांडूळ या सर्पाबद्दलही अशाच गैरसमजुती आहेत. जादूटोण्यासाठी मांडूळ सापाला प्रचंड मागणी असते. हा साप मिळावा म्हणून काही तांत्रिक -मांत्रिक त्याच्या सतत शोधात असतात. काही वेळा समोरची व्यक्ती सांगेल त्या पैशांना तो साप विकत घेतात. अनेकांचा असा समज आहे की या सापाला दोन तोंड आहेत त्यामुळे तो दोन्ही बाजूंनी चालू शकतो. या सापाबद्दल असा समज आहे की हा साप उन्हात धरल्यावर त्याची सावली पडत नाही किंवा त्याला आरशासमोर धरलं तर त्याचं प्रतिबिंब आरशात दिसत नाही. या सापाची पूजा केली की पैशांचा पाऊस पडतो अशा अनेक समजुती आहेत.
 गेल्या काही वर्षापासून सापांचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून सर्वच स्तरावर जनजागृती झाली आहे. प्रसारमाध्यमांचं सहकार्यही तेवढंच महत्त्वाचं ठरलं आहे. नागरिकांचा प्रतिसादही चांगला आहे. मात्र मिळणारा प्रतिसाद बघून काही हौशनवशे सर्पमित्र केवळ प्रसिद्धिमाध्यमांच्या मागे धावण्यासाठी साप पकडण्यासाठी पुढे सरसावतात. माझी या सर्पमित्रांना विनंती आहे की, साप पकडणं ही साधी गोष्ट नाही. साप पकडण्याची शास्त्रीय पद्धत अवगत करणं जरुरीचं आहे. धामण हा बिनविषारी साप जर का तुम्ही पकडत असाल आणि तीच पद्धत जर का घोणस, नाग हे साप पकडण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केला तर ते घातक ठरण्याची शक्यता नाकारता येतं नाही. जर का तुम्हाला खरोखरचं सर्पमित्र होण्याची इच्छा असेल तुम्ही सुशिक्षित असणं गरजेचं आहे. आपल्याला जी माहिती हवी आहे ती मिळवण्यासाठी इंटरनेट किंवा डिस्कव्हरी चॅनलवर अनेक प्रकारची माहिती दिली जात असते. उदाहरण द्यायचं झालं तर कोणता साप कधी अंडी घालतो. त्यांना कोणते आजार होतात त्यांची निगा कशी ठेवावी, त्यांना पकडल्यानंतर जंगलात सोडताना त्यांच्यासाठी सुयोग्य जागा कोणती याचीही जाण असणं गरजेचं आहे. कुणाला सर्पदंश झालाच तर प्रथमोपचार कसा करावा. सर्प सोडण्यासाठी जाताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी तसंच रात्रीच्या वेळेस स्टीक टॉर्च, प्रथमोपचार किट सोबत असणं आवश्यकच आहे. सर्पमित्राने पहिल्यांदाच साप पकडल्यानंतर तो सर्वांना दाखवणं टाळावं कारण हे दाखवताना सापाला खूप वेदना होत असतात. साप पकडून तो सुरक्षित ठिकाणी सोडून देणं हे सामाजिक काम आहे या भावनेतून सर्पमित्र काम करीत असतो. मात्र हे सामाजिक काम मृत्यूलाही निमंत्रण देणारं ठरू शकतं. साप हाताळताना अनेक सर्पमित्रांना स्वत:चे प्राणाही गमवावे लागले आहेत. परंतु समाजहितासाठी धावणा-या सर्पमित्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या कुटुंबीयांसाठी विमा योजना दिल्यास तो आमच्यासाठी आधार ठरेल.

7 comments:

  1. नमस्कार,
    नाग सर्प रक्षण आणि पर्यायाने शेती,निसर्ग,पर्यावरण रक्षण ह्या अनुषंगाने मी काहि लेखन केले आहे
    तर तें छापताना मला त्याबरोबर महाराष्ट्रातील सर्व सर्प मित्र मंडळी ज्यांना फोन केल्यावर
    तें साप नाग पकडतात त्यांचे संपर्क क्रमांक कोड सहित किंवा भ्रमण ध्वनी क्रमांक असतील तर
    कृपया मला पाठवू शकाल का ? मला इंटरनेट वर क्रमांक सापडले नाहीत , आणि मी शोधण्यापेक्षा
    अधिकृत संस्थांकडून क्रमांक मिळाले तर बरे होईल म्हणून मी हा इमेल पाठविला आहे.
    मला आपण ह्या कामात काहि मदत करू शकाल का ? क्रमांक पाठविले तर मी आपला आभारी राहीन.
    आपल्या उत्तराची वाट पहाट आहे.
    कवी - सुरेश रघुनाथ पित्रे.
    पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
    चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
    संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ ,
    भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
    Email ID - prasarprachar@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. Vanktesh Patil
      At: Malave, Tal: Radhanagri, Dist: Kolhapur.
      Pin 416212
      Mob. 9175167840

      Delete
    2. Vanktesh Patil
      At: Malave, Tal: Radhanagri, Dist: Kolhapur.
      Pin 416212
      Mob. 9175167840

      Delete
    3. Bhava play store vr sarp Mitra app aahe te download kar aani tyavar tula sarv contact milel

      Delete
  2. 7875752947 सर्पमित्र सुखदेव गोठमुकले

    ReplyDelete
  3. Pratap dhole
    Di.vashim vidarbh
    9860282715

    ReplyDelete