Saturday 12 November 2011

बिनविषारी सर्प


तस्कर

तस्कर हा बिनविषारी साप असून, तो रात्री बाहेर पडतो. त्यामुळे त्याचे तस्कर असे नाव पडले. इंग्रजीत त्याला "ट्रिकेंट' असे म्हणतात.
हा मुख्यत्वे दक्षिण भारत, श्रीलंका मध्ये आढळतो. महाराष्ट्रातही विपुल प्रमाणात आढळतो, छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, आडगळीच्या जागा ह्या आवडत्या जागा आहेत
अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेले असतात.


गवत्या

या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लंबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ भागात राहणारा असला, तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. तो गवत व झुडपांमध्ये असतो; पण घरातही येतो.

                                        गवत्या सापाच्या नराची लांबी सु. ६० सेंमी., तर मादीची सु. ९० सेंमी. असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा
( उंचवटा ) असल्यामुळे ती खरखरीत असते. खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लहान असते. तो गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही;  मात्र तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही.
                                    बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मीलनकाल दरवर्षी फेब्रुवारी - मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिले जन्मतात.
गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो, क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात.


खापरखवल्या  = shield snake ( शिल्ड टेल स्नेक )

शिल्ड टेल स्नेक हा दुमिर्ळ जातीचा साप आहे. काळ्या रंगाच्या या सापाच्या मानेखाली पिवळसर पट्टा असतो. शेपटी बोथट असल्यामुळे त्याला शिल्ड स्नेक म्हणतात. शेपटीच्या रचनेवरून त्याला हे नाव पडले आहे. याचबरोबर तो 'कवचपुच्छ' या नावानेही ओळखला जातो. मराठीत या सापाला खापरखवल्या म्हटले जाते इंग्रजीत त्याला  'शिल्ड टेल' म्हणतात तर 'युरोपेलिसिस माय लेपिस' या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. तसेच बिनविषारी जातीत मोडत असल्याने त्याचा कुणालाही उपदव होत नाही. आपल्या परिसरात आढळणारा हा वैशिष्ट्यपूर्ण साप आता नष्ट होऊ लागलाय. त्याची लांबी 35 ते 40 सेंमी आहे.
  
खापरखवल्या साप 'बांडा' या नावानेही ओळखला जातो. नेहमी जमिनीखाली राहणारा हा साप पावसाळ्यात भक्ष्याच्या शोधात जमिनीच्या वर येतो. गांडूळ आणि अळ्या हे त्याचे प्रमुख खाद्य असते
   
खापरखवल्या हा साप दुतोंड्या सापांच्या गटात मोडतो. बहुतांश साप अंडी घालतात, मात्र 'खापरखवल्या' हा दुमिर्ळ साप सस्तन आहे. तो पिलांना जन्म देणाऱ्या जातीचा आहे. त्याची मादी एका वेळेस तीन ते चार पिल्लांना जन्म देते.


डुरक्या घोणस sand boa
 
पांढुरक्या रंगावर काळपट तपकिरी रंगाचे ठिपके असतात
लांबी २ ते अडीच फुट पर्यंत
उंदीर पाली सरडे पक्षी
या सापाला अजगराचे पिल्लू समजले जाते याची शेपटी कानसी प्रमाणे खर खरीत असते हा साप अत्यंत चिडखोर वृत्तीचा
ह्याचे शरीर एकदम जाडजुड असून शरीराची लांबी कमी आणि शेपुट अगदी आखूड असते. ह्याच्या शरीरावर गडद तपकीरी धब्बे असतात. कधी कधी हे धब्बे फिकट भगव्या रंगाचेसुद्धा असतात. पिल्लांमधे हे रंग जास्त आकर्षक आणि चमकदार असतात. याचे डोके त्रिकोणी आणि काहीसे विषारी घोणसा सारखे दिसते. मात्र हा साप पुर्णपणे बिनविषारी आहे. याचे शरीर बारिक मानेनंतर एकदम जाड, गोल गरगरीत असते ते थेट शेपटीपर्यंत. शेपुट मात्र अगदीच थोटकी आणि निमुळती असते. याच्या तोंडावरचे आणि शेपटीवरचे खवले अतिशय खरखरीत असतात. पाठीवरचे आणि मधल्या शरीरावरचे खवले मात्र चमकदार आणि गुळगुळीत असतात.
आज भारतात हे साप सर्वत्र सापडतात आणि त्यांना रहाण्यासाठी रेताड जमीन आणि खडकाळ भाग लागतो. बऱ्याच वेळेला तो आपल्या दणकट डोक्याच्या सहाय्याने आणि खरखरीत खवल्यांच्या सहाय्याने मऊ मातीत स्वत:ला पुरून घेतो आणि कित्येक तास दबा धरून बसतो. या वेळेस त्याचे संपुर्ण शरीर आत मातीखाली असते आणि फक्त डोक्याचा, डोळ्यांचा भाग तेवढा जमीनीवर असतो. हा साप निशाचर असून रात्रीच्या वेळी बाहेर पडतो आणि भक्ष्याच्या शोधाकरता हिंडतो. निशाचर साप असल्यामुळे याच्या डोळ्यात उभी बाहुली असते. ही बाहुली दिवसा जास्त प्रकाशात बऱ्याच प्रमाणात आकुंचीत करून येणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण ठेवले जाते. अर्थातच रात्री अंधाऱ्या कमी प्रकाशात ही बाहुली जास्तीत जास्त उघडी ठेवून जास्तीत जास्त प्रकाश आत घेतला जातो. अगदी कॅमेराच्या लेन्सच्या ऍपरचर सारखे काम ह्या डोळ्यांचे होते. साधरणत: उंदराच्या बिळासमोर दबा धरून हा साप बसतो आणि त्यातुन येणारा अथवा आजुबाजुने जाणाऱ्या उंदरावर, लहान प्राण्यावर तो झडप घालतो आ णि आपल्या वेटोळ्यात जखडून त्याला करकचून आवळतो. काही सेकंदातच गारद केलेल्या त्या प्राण्याला मात्र तो पुर्ण मेल्याशीवाय खात नाही. काहीसा गलथान वाटणारा जरी हा साप असल तरी तो वेटोळे घालून बसतो आणि प्रचंड वेगाने ते वेटोळे एखाद्या स्प्रिंगसारखे सोडून पटकन चावा घेतो. हे चावणे बिनविषारी असले तरी नक्कीच वेदनादायक असते. उंदीर, पाली, सरडे हे त्याचे मुख्य खाणे असले तरी तो बेडूक आवडीने खातो. क्वचीतप्रसंगी तो छोटे छोटे पक्षीही खातो. ह्याच्या पिल्लांना मात्र खाण्यासाठी छोटे किटकही चालतात. उन्हाळ्याच्या सुरवातीस ह्या जातीच्या सापाची मादी थेट सहा ते आठ पिल्लांना जन्म देते. ही पिल्ले त्यांच्या पालकांसारखीच दिसतात मात्र त्यांचे रंग अधिक उठावदार आणि चमकदार असतात. आपल्याकडे या जातीच्या सापाला त्याच्या कातडीकरता मारले जाते. आकर्षक रंगसंगतीमुळे या कातडीला परदेशात बरीच मागणी आहे आणि हे शिकारी "बेबी पायथन" या नावाने ही कातडी विकतात.