Tuesday 24 May 2011

पोवळा

पोवळा
 
हा साप विषारी असून प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळतो. भारताचा पश्चिम घाट (प्रदेशनिष्ठ प्रजाती), केरळ व तमिळनाडूमधील मुन्नार, निलगिरी, अण्णामलाई, त्रावणकोर आदी पर्वतीय व जंगल प्रदेशात हा साप आढळतो. महाराष्ट्रात आंबोली, कोयना, कास, पाचगणी, खंडाळा, भीमाशंकर येथे आढळतो. गुजरातमध्ये डांग जिल्ह्यातही आढळतो. त्याला हिंदीत कालाधारी मूंगा तर इंग्रजीत स्ट्रीप्ड कोरल स्नेक असे म्हटले जाते. त्याचे शास्त्रीय नाव कॅ लीओपीस निग्रेन्स आहे. त्याची लांबी जास्तीत जास्त तीन फूट नऊ इंच 114 सें. मी. (3 फूट 9 इंच/45 इंच) असते.
पर्वतीय प्रदेशात त्याची लांबी अधिक असते. हा साप दिनचर तसेच निशाचर असून छोटे सरडे, इतर साप हे त्याचे भक्ष्य असते. पावसाळ्यात मादी तीन ते सहा अंडी देते.
     या सापाचे शरीर लांब, सडपातळ, व दंडगोलाकार असून छोटे काळे डोळे, शेपूट आखूड, लाल व पांढरे खवले, गडम, काळा जांभळट रंग , पाठीवर तीन ते पाच उभ्या काळ्या रेषा, डोळ्यांमध्ये एक फिक्कट काळा आडवा पट्टा ही याची वैशिष्ट्ये असतात. पोटाकडचा भाग चकचकीत व लाल असून त्यावर पांढरे आडवे पट्टे, रेषा असतात.